आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  सॉफ्टवेअर्स
 
  चांगले व उत्तम सॉफ्टवेअर्स मोफत कुठे मिळतील ?
 


डाऊनलोड.कॉम (www.download.com) ही सर्व प्रकारचे सॉफ्ट्वेअर्स शोधण्यासाठी चांगली वेबसाईट आहे.

निरनिराळ्या प्रकारे अनेक सॉफ्ट्वेअर्स आपण www.download.com वर शोधू शकता . इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com वेबसाईट उघशल्यास सुरवातीलाच पहिल्या पानावर वरच्याबाजूस शोधण्यासाठी व्यवस्था केली आहे या जागे मध्ये आपण आपणास हवे असलेल्या सॉफ्टवेअचे नावच नाही तर त्या एवजी त्या संबंधीत एखादा शब्द अथवा वाक्य जरी टाईप करुन ते शोधले तरी हि वेबसाईट त्या शब्दाशी अथवा वाक्याशी संबंधीत सॉफ्टवेअर शोधुन देते.

उदाहरणार्थ एखादी फाईल डिलिट केल्यानंतर ती 'रिसायकल बीन'  (Recycle Bin) मध्ये जाते तर तेथून ही डिलिट केल्यानंतर ती कॉम्प्युटर मधून कायमची नष्ट होते . आता समजा अशा प्रकारे तुमच्या हातुन चुकून 'रिसायकल बीन'  मधून देखिल डिलिट झालेली फाईल जर तुम्हाला परत मिळवायची असेल तर www.download.com  वेबसाईट्वर आपण 'Recycle Bin Recovery'  असे शोधल्यास हि वेबसाईट या शब्दाशी संबंधीत सॉफ्टवेअर्स शोधुन त्यांची यादी समोर ठेवतो. अशा प्रकारे आपण आपणास हव्यात्या सॉफ्ट्वेअर्स संबंधीचे शब्द टाईप करुन त्यावरील सॉफ्टवेअर्स शोधू शकता.

डाऊनलोड.कॉमवर सॉफ्टवेअर्स कसे शोधावे आणि कसे डाऊनलोड करावे याची क्रिया खाली दिली आहे.

१. इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये www.download.com  सुरु करा.


२. आता आपल्या समोर www.download.com  वेबसाईट सुरु होईल.


३. या वेबसाईटमध्ये वरील उजव्या कोपर्‍यात सॉफ्टवेअर शोधण्यासाठी व्यवस्था केली आहे.


४. तेथील 'Search'  या जागेमध्ये आपणास जे सॉफ्टवेअर हवे आहे, त्याचे नाव टाईप करा व बाजूच्या 'Go'  या बटणावर क्लिक करा. (उदा. या जागेमध्ये 'Recycle Bin Recovery'  असे टाईप करा.)


५. आता त्या पानाच्यामध्ये वरील बाजूस आपणास 'Search results matching:'  या नावापूढे आपण शोधण्यासाठी दिलेले नाव असेल. तसेच त्या पानावर खाली निरनिराळ्या सॉफ्टवेअरची यादी दिलेली असेल.


६. त्या यादीच्या उजव्याबाजूस आपणास   असा विभाग दिसेल. या विभागाद्वारे आपण आपल्याला हव्या असलेल्या सॉफ्टवेअरला लवकर शोधू शकतो.


७. त्यातील 'By platform:  Windows'  वर क्लिक करा. असे केल्याने फक्त Windows  वर चालणार्‍या सॉफ्टवेअरची यादी येईल.


८. आता त्याच विभागातील 'By license type:'  मधिल " Free "  वर क्लिक करा. असे केल्याने फक्त Free  असलेल्या म्हणजेच मोफत असलेल्या सॉफ्टवेअरची यादी येईल.


९. आता आपला समोर फक्त मोफत असलेल्या सॉफ्टवेअरची यादी असेल, त्यावरील जागेत आपणास 'SORT BY'  असे लिहिलेले दिसेल, याचा अर्थ यादीतील सॉफ्टवेअरची विभागणी कशी करावी. त्याखालील ' Date added ' वर क्लिक करा. (याचा अर्थ जे सॉफ्टवेअर्स तारखेप्रमाणे नजिकच्या काळामध्ये बनविले असतील ते सर्वात वर दिसतील.)


१०. असे केल्याने आता मगाशी आपल्यासमोर आलेली सॉफ्टवेअर्स यादी परत थोडीशी बदललेली दिसेल. पण आता या यादीमध्ये फक्त मोफत आणि नजिकच्या काळामध्ये बनविलेले असतील तेच दिसतील.

११. शेवटी कुठला सॉफ्टवेअर चांगला आणि कुठला अनावश्यक ते आपण स्वतःच ठरवायचे. यादीतील प्रत्येक सॉफ्टवेअरच्या नावाखाली त्याची थोडक्यात माहिती दिलेली असेल. त्यातही जर आपण त्या सॉफ्टवेअरच्या नावावर क्लिक केले तर त्या सॉफ्टवेअरची अधिक माहिती आपणास मिळेल. तसेच त्यामध्ये ते वापरलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया देखिल वाचायला मिळतात, याचा उपयोग तो सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचा की नाही हे ठरविण्यासाठी होतो. आपणास जो सॉफ्टवेअर उपयुक्त वाटेल त्याच ओळीत शेवटी असलेल्या ' Download Now ' ह्या बटणावर क्लिक करुन ते सॉफ्टवेअर डाऊनलोड करावे. 

टीप : एखादा सॉफ्टवेअर किती चांगला आहे, हे त्याच्या बाजूला असलेल्या 'योग्यतेच्या चिन्हावरुन (Ranking)' वरुन ठरवू नये.

एखादा सॉफ्टवेअर किती चांगला आहे, हे त्याच्या बाजूला असलेल्या 'योग्यतेच्या चिन्हावरुन (Ranking)' वरुन ठरवू नये. कारण हे रँकिग ज्यांनी ते सॉफ्टवेअर वापरले आहे त्यानी दिलेले असते. त्याएवजी जरा वेगळा विचार करा, एखादी सॉफ्टवेअर  कंपनी नविन सॉफ्टवेअर बनविताना त्याच सॉफ्टवेअर सारख्या इतर चांगल्या सॉफ्टवेअर्सचा विचार करते आणि त्यांच्यापेक्ष्या चांगला सॉफ्टवेअर बनविते, म्हणूनच एखादे चांगले सॉफ्टवेअर तेच असू शकते, जे नजिकच्या काळामध्ये बनलेले असेल.

   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.