आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  इतर
 
  शोधाल तर सापडेल
 


आजही जेव्हा आपण एखादा नवीन गोष्ट पाहतो तेव्हा, अरेच्च्या! असेही होते असे बोलतो आणि ती गोष्ट दाखविणारा आपणास त्यात काय? अशी फुशारकी मारतो. मग त्याच्या समोर आपण किती अडाणी आहोत असे आपणास वाटू लागते.

हे मान्य आहे की आहे की एखादी नवीन गोष्ट पाहिल्यास आश्चर्यचकित व्हायला होते, पण दरवेळेस कुठलीही नवीन गोष्ट दुसर्‍यानेच आपल्याला दाखवायला हवी हे मात्र आपणास बदलता येईल.

शोधल्यास सर्व सापडते हे तर तुम्हालाही मान्य असेल, मग काय शोधायचे हाच मोठा प्रश्न असतो. पण जर काय शोधायचे हे माहीत असेल तर मग शोधण्यासाठी त्याची तुम्ही एवढे दिवस थांबलात का असा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल.

असो. इथे आता हा प्रश्न आहे की काय शोधायचे आणि कुठे सापडेल? या दोन्ही गोष्टींचे उत्तर अगदी सोपे आहे. थोडावेळ असा विचार करा की कुठली गोष्ट असू शकत नाही आणि ती गोष्ट आठविल्यास त्याची माहिती गुगल.कॉमवर शोधायची. तुम्हाला असे वाटेल की हे सहज सोपे नाही. पण खरंच हे शक्य आहे.

इथे काही कॉम्प्युटरमधील काही अशा प्रोग्रॅमची ओळख दिली आहे, जे प्रोग्रॅम तुम्ही कधी विचार देखिल केले नसतील. इतकेच की या प्रोग्रॅमबद्दल जास्त कुणाला माहिती देखिल नसते. जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला नक्कीच सापडतील तसेच हे प्रोग्रॅम शोधता-शोधता अशाच निरनिराळ्या प्रोग्रॅमबद्दल तुम्हाला कल्पना यावी या विचाराने इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नाही आहे.

१. याहू चॅटींग तर तुम्ही नक्कीच केले असेल. आपण आपल्या याहू मॅसेंजरमध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर ती व्यक्ती ऑनलाईन असल्यास चॅट करू शकतो, हे तुम्हाला माहीत असेलच. एखाद्याशी चॅट करायचे नसल्यास आपण त्याला मॅसेंजरमध्ये ब्लॉक करतो, त्यामुळे फक्त त्याच्यासाठीच आपण अदृश्य होतो. पण जर एखादा आपला मित्र जर एखाद्यावेळेस आपणास चॅटींगद्वारे जरा जास्तच त्रास देत असेल व त्यावेळी त्याला टाळता येत नसेल तर काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. जरा विचार करा एका अशा प्रोग्रॅम बद्दल ज्या प्रोग्रॅमद्वारे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरून त्या व्यक्तीचा याहू मॅसेंजर बंद करू शकता आणि ते देखिल त्या न काही सांगता. तुमच्या प्रोग्रॅममुळे त्याचा याहू मॅसेंजर आपोआप बंद होईल व पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून देखिल बंद होत असल्यास काहीतरी प्रॉब्लेम आहे असे समजून तो तेव्हा चॅटींग करण्याचा विचारच सोडून देईल.


२. सध्या हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी हा प्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तरीही सांगतो. बर्‍याचवेळा कॉम्प्युटरची हार्डडिस्क खराब होते आणि त्यातील डाटा म्हणजेच माहिती नष्ट होते. एखाद्या व्हायरसमुळे अथवा बरीच जुनी हार्डडिस्क काही काळाने खराब होते व आपला कॉम्प्युटर चालायचा बंद होतो. अशावेळी हार्डवेअर इंजिनिअर आपला कॉम्प्युटरची हार्डडिस्क खराब झाली असून आपला सर्व डाटा उडाला असे सांगतो. यावेळी हळहळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. अशावेळी तोच हार्डवेअर इंजिनिअर आपल्याला हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी करून घ्या असा सल्ला देतो. परंतू हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी करून घेणे फार खर्चीक आहे असेही तो सांगतो. बर्‍याच मोठ्या कंपन्यांना हा खर्च करणे शक्य होते परंतू सर्वसामान्य व्यक्तीला हा खर्च शक्य नसतो व त्याचा कॉम्प्युटरमधील संपूर्ण डाटा नष्ट होतो. जरा विचार करा अशाप्राकारे डाटा परत मिळवून देणारा सॉफ्टवेअर तुम्हाला मिळाल्यास.


३. एखादी फाइल डिलिट केल्यास ती रिसायकल बीन (Recycle Bin) जाते आणि ती तेथून देखिल डिलिट केल्यास कॉम्प्युटरमधून नष्ट होते हे आपणास माहीत असेलच. पण जरी ती आपल्या समोरून नष्ट झाली असली तरी प्रत्यक्षात ती कॉम्प्युटरमधून नष्ट झालेली नसते. मग एखादी महत्त्वाची फाइल आपल्या हातून डिलिट झाल्यास मोठी पंचाईत होते. अशावेळी त्या फाइलमधील सर्व काम पुन्हा करावे लागते.  इथे जरा विचार करा. एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो आपणास रिसायकल बीन (Recycle Bin)  मधून देखिल डिलिट केलेल्या इतकेच की आठवड्यापूर्वी देखिल रिसायकल बीन (Recycle Bin)  मधून देखिल डिलिट केलेल्या फाइली व्यवस्थित मिळवून देईल.


४. वर्ड अथवा एक्सेलमध्ये फाइलीला पासवर्ड देऊन सुरक्षित करणे फारच सोपे आहे. परंतू अशाप्रकारे पासवर्ड दिल्यानंतर तो विसरल्यास तो काय होता हे न आठवल्यास ती महत्त्वाची फाइल नंतर अनावश्यक बनते. अशावेळी पासवर्ड मिळवून देणार्‍या कंपन्या त्या फाइलीचा पासवर्ड परत मिळवून देण्याचे बरेच पैसे आकारतात. जरा विचार करा त्या कंपन्या फाइलीचा पासवर्ड परत मिळवण्यासाठी काय करीत असतील. प्रत्यक्षात त्या कंपन्या कुठलेतरी सॉफ्टवेअर वापरून त्या फाईलीचा पासवर्ड परत मिळवतात. पण जर तसा सॉफ्टवेअर आपल्यास मिळाल्यास.


५. कितीतरी वेबसाइटवर पासवर्ड सोबत युजर आयडी देखिल साठविण्याची सोय असते. अशाठिकाणी लॉगीनच्या ठिकाणी (Remember Me)  असे लिहिलेले असते. म्हणजेच पुढीलवेळेस जेव्हा आपण त्या वेबसाइटवर जाता तेव्हा लॉगीन करताना युजर आयडी आणि पासवर्ड देण्याऐवजी तेथे आधीच आपला युजर आयडी आणि पासवर्ड असतो अथवा युजर आयडी दिल्यास पासवर्ड आपोआप समोर येतो. परंतू अशावेळी तो पासवर्ड गोल चिन्हांच्या स्वरूपात असतो त्यामुळे तो ओळखणे शक्य नसते. इथे जरा विचार करा एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो अशा ठिकाणी त्या गोल चिन्हांच्या स्वरूपात दिसणार्‍या पासवर्डला व्यवस्थित इंग्रजी शब्दांमध्ये दाखवेल.


६. आपण कितीही स्वतःला हुशार समजत असलो तरी आपल्या पाठीमागे आपल्या कॉम्प्युटरवर काय काम केले जाते, कुठल्या फाइली उघडल्या जातात, कुठल्या वेबसाइट पाहिल्या जातात, कोणाला काय -मेल लिहिले जातात, कोणते पासवर्ड दिले जातात .. बर्‍याच गोष्टी आपल्या नकळत केल्यास आपणास त्याची काहीच माहिती मिळत नाही. पालकांसाठी हीच समस्या मोठी समस्या असते ती म्हणजे त्याच्या पाठीमागे त्याचा मुलगा/मुलगी कॉम्प्युटरवर काय करतात. अशावेळी विचार करा एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो आपल्या कॉम्प्युटरवर कि-बोर्डद्वारे दाबलेल्या प्रत्येक बटणाची नोंद ठेवेल. तसेच कुठले-कुठले प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर, वेबसाइट वापरल्या गेल्या या सर्वांची माहिती आपणास देईल.


७. बर्‍याच कंपन्यांमध्ये सध्या त्यांच्या कंपनीतील सहकार्‍यांनी ऑफसमध्ये फालतू टाईमपास करू नये म्हणून त्यांच्या कॉम्प्युटरवर इंटरनेट असूनदेखील चॅटींगकरण्याचे प्रोग्रॅम बंद केलेले असतात. म्हणजेच त्या वेबसाइटदेखील सुरू होत नाहीत. त्यामुळे ऑफिसमधील व्यक्तीशी जरी कामासंबंधी बोलायचे असल्यास चॅटींगचे सॉफ्टवेअर नसल्याने वेळ वाया जातो. इंटरनेटरवर असे बरेच प्रोग्रॅम मोफत मिळतात ज्याद्वारे ऑफिसमध्येच आपण आपल्या सहकार्‍याशी चॅटींगवरुन बोलू शकतो.


८. बर्‍याच पालकांना आपला मुलगा/मुलगी कोणत्या वेबसाइट पाहतात, त्यांच्या मागे कॉम्प्युटरवर काय करतात याची चिंता असते. अशावेळी त्यांना नको असलेल्या वेबसाइट पाहण्यापासून कसे थांबवायचे हा मोठा प्रश्न असतो. यासाठी सध्या इंटरनेटवर नको असलेल्या वेबसाइट बंद करणारे वेबसाइट ब्लॉकर सॉफ्टवेअर देखिल मिळतात आणि ते देखिल अगदी मोफत.

 

टीप : एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नसल्याने तसा अथवा तशा स्वरूपाचा प्रोग्रॅम आपणास एखाद्या वेबसाइटवर आढळल्यास तो डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती वाचून घ्या तसेच त्या प्रोग्रॅम/सॉफ्टवेअर बद्दल इतर वेबसाइटवर कुणी त्याबद्दलचा अनुभव दिल्या असल्यास तो वाचूनच मग निर्णय घ्यावा. शक्यतो डाउनलोड.कॉम वरून कुठलाही सॉफ्टवेअर डाउनलोड करावा जेणे करून व्हायरसचा त्रास होणार नाही.

डाउनलोड.कॉमवरुन एखाचे चांगले सॉफ्टवेअर शोधून डाउनलोड कसे करावे हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.