आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  भारतीय रेल्वे
 
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
 


वेबसाईटवरुन ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग

१. भारतीय रेल्वेची  www.irctc.co.in   ही वेबसाईट इंटरनेट एक्सप्लोरर मध्ये सुरु करा. 

२. वेबसाईटवरील आपल्या मेंबरशीपच्या ऊजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा.


३. आता आपल्यासमोरील पानाच्या वरील बाजूस  " Plan My Travel " नावाचा चौकोन असेल.


४. या चौकोनामध्ये आपणास कुठून-कुठे, किती तारखेला आणि आपणास प्रवास कुठल्या क्लासने करायचा आहे ते द्यायचे असते.

> सुरुवातीला त्यातील ' '  ह्या जागेपुढील या चिन्हावर क्लिक करा.

आता आपल्यासमोर येणार्‍या चौकोनात प्रथम    आपणास प्रवास जेथून सुरु करायचा आहे त्याचे नाव द्या.    बाजूच्या  ' submit '  या बटणावर क्लिक करा. आता त्याच खाली अजून एका चौकोनात तेथील स्टेशनची नावे येतील.    त्यामध्ये आपणास ज्या स्टेशनपासून प्रवास करायचा असेल त्यावर क्लिक करा.    आता त्याच्या बाजूच्या  ' GO '  या बटणावर क्लिक करा.

५. आता त्या स्टेशनचे नाव मगाचच्याच चौकोनात येईल. अशाच प्रकारे मग त्यापूढील '  '  ह्या जागेपुढील या चिन्हावर क्लिक करा व वर सांगितल्याप्रमाणे ज्याठिकाणी जायचे आहे त्या स्टेशनचे नाव निवडा.

६. मग खालिल जागेतील मध्ये आपणास ज्या दिवशी प्रवास करायचा आहे तो दिवस निवडा. तसेच त्याच्या पुढील जागेतील मध्ये आपणास ज्या 'क्लासने'  प्रवास करायचा असेल ते निवडा.


७. आता त्यातील ' Ticket Type * '  पुढील च्या गोलावर क्लिक करा.

( चा अर्थ आपण बुकिंग केलेले तिकिट पोस्टाने घरी येईल. चा अर्थ आपण बुकिंग केलेले तिकिट वेबसाईटवरुनच प्रिंट करुन घ्यावे लागेल तर चा अर्थ या दोन्ही प्रकारामध्ये आपणास जर तात्काळ बुकिंग करायचे असेल तर इथे क्लिक करा.)

८. आता त्या चौकोनातील ' Find Trains '  ह्या बटणावर क्लिक करा.

 

 

 

पूढे जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

  प्रस्तावना
  www.irctc.co.in  ह्या वेबसाईटवर मोफत मेंबरशीप घ्या.
  वेबसाईटवरुन ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग ऍनिमेशन (साईझ १३MB) डाऊनलोड करा.
  टिप : वरील टिकिट बुकिंग ऍनिमेशनची फाईल आकाराने फार मोठी आहे. ती डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागेल, ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करुन माऊसने डबल क्लिक करुन पहा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. - सचिन पिळणकर - मोबाईल : ० ९८९२२४१४३३.
   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.
 
,,,,