आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  भारतीय रेल्वे
 
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
 


www.irctc.co.in  ह्या भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर मोफत मेंबरशीप

१) भारतीय रेल्वेच्या www.irctc.co.in  ह्या वेबसाईटद्वारे टिकिट बुकिंग करण्यासाठी ह्या वेबसाईटवर सभासद म्हणजेच मेंबरशीप [ Membership ] घेणे आवश्यक आहे. ही मेंबरशीप अगदी मोफत आहे.

२) ह्या वेबसाईटवरील पहिल्याच पानावर या मोफत मेंबरशीपची व्यवस्था केली आहे.

३) हि मेंबरशीप फॉर्म आपण याहू [ yahoo.com ] अथवा रेडिफ [ rediff.com ] वेबसाईटवर नविन ईमेल पत्ता बनविताना जसा फॉर्म भरतो तसाच सोपा आहे.

४) ह्या वेबसाईटवर मेंबरशीप म्हणजेच सभासद कसे व्हायचे ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

५) ह्या वेबसाईटवर मेंबरशीप घेताना आपण आपणास हवे असलेले { उपलब्ध असलेले } 'युजर नेम' [ Username ] आणि पासवर्ड [ password ] व इतर आपल्या संबंधीची माहिती द्यावी लागते. आपण दिलेले 'युजर नेम'  उपलब्ध असल्यास तत्काळ मोफत मेंबरशीप मिळते.

६) या वेबसाईटवर मेंबरशीप घेताना सर्व माहिती व्यवस्थित आणि खरी देणे आवश्यक आहे. कारण या मेंबरशीपमध्ये आपण दिलेल्या पत्त्यावरच आपण बुक केलेले [ आरक्षित केलेले ] टिकिट येणार असते.

७) एकदा का आपण या वेबसाईटवर मेंबरशीप घेतली की नंतर या मेंबरशीपच्या 'युजर नेम' आणि 'पासवर्ड' द्वारे आपण या भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर कधीही आणि कितीही वेळा जाऊन माहिती पाहू शकतो.

८) आपल्या मेंबरशीपद्वारे या वेबसाईटवरुन टिकिट कशी आरक्षित करावी ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

९) या वेबसाईटवर टिकिट बुक केल्यानंतर त्या टिकिटीचे पैसे ऑनलाईन भरण्याची व्यवस्था देखिल करण्यात आलेली आहे. टिकिटीचे पैसे ऑनलाईन भरण्यासंबंधी अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.

१०) अभिनंदन, आपले टिकिट नोंदविल्या नंतर तसेच त्याच्या पूढे ऑनलाईन पैसे भरल्यानंतर आपल्या टिकिटीचे वेबपेज शेवटी दिसते इथे या पानाची प्रिंट काढण्याची देखिल सोय उपलब्ध आहे.

११) आपला विशास बसणार नाही पण ऑनलाईन टिकिट बुक करण्यासाठी [ Reservation ] जेमेतेमे ५-१० मिनिटे लागतात.

१२) सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वात जलद म्हणजे १-२ दिवसांत आपले टिकिट कुरिअरने आपल्या घरी येते. भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन टिकिट बुकिंग केल्यानंतरची त्यांची कुरिअर व्यवस्था इतकी जलद आहे की कधी-कधी असाही अनुभव मिळतो की जर तुम्ही रात्री ९-१० वा. जरी टिकिट बुक केली तरी दुसऱ्या दिवशी दुपारी २-३ वा. पर्यंत टिकिट आपल्या पत्त्यावर आलेले असते.

१३) भारतीय रेल्वेच्या ऑनलाईन टिकिट बुकिंग विषयी चौकशीसाठी आपण खालील त्यांच्या दिल्लीच्या फोन द्वारे अथवा ई-मेलद्वारे संपर्क करु शकता.

Indian Railway Catering and Tourism Corporation Ltd.

Tel. : 011 - 23345500 / 23344787 / 23344773 / 23345800 / 23340000,
Fax. : 23345900, E-mail : care@irctc.co.in

 

 

 

पूढे जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

  प्रस्तावना
  www.irctc.co.in  ह्या वेबसाईटवर मोफत मेंबरशीप घ्या.
  वेबसाईटवरुन ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग ऍनिमेशन (साईझ १३MB) डाऊनलोड करा.
  टिप : वरील टिकिट बुकिंग ऍनिमेशनची फाईल आकाराने फार मोठी आहे. ती डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागेल, ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करुन माऊसने डबल क्लिक करुन पहा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. - सचिन पिळणकर - मोबाईल : ० ९८९२२४१४३३.
   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.