आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  भारतीय रेल्वे
 
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
 


प्रस्तावना

साधी रेल्वेची टिकिट जरी काढायची असली तरी सध्या मोठ्या रांगेत ऊभे रहावे लागते. त्यात जर गावी ( बाहेरगावी ) जाणार्‍या रेल्वेची टिकिट काढायची असेल तर सुरवातीलाच चौकशीसाठीच मोठी रांग लावावी लागते. चौकशीच्या रांगेत कुठल्या कुठल्या रेल्वे आपल्याला हव्या असलेल्या ठिकाणी म्हणजेच आपल्या गावी जातात ते कळल्यावर मुख्य टिकिटीच्या खिडकीवर बराच वेळ उभे राहील्यावर कळते की टिकिट उपलब्ध नाही किंवा 'वेटिंग लिस्ट' ( उपलब्ध टिकिट संपल्या असून जर कोणी टिकिट रद्द केले तर त्यासाठी तुमचा क्रमांक रांगेत आहे. ) वर तुम्हाला टिकिट मिळेल. जर 'वेटिंग लिस्ट' मध्ये टिकिट घेतले व आपला क्रमांक बराच पुढे असून शेवटी आपणास टिकिट न मिळण्याची शक्यता असते.

जर त्याच ट्रेनमध्ये 'क्लास' ( आसन व्यवस्था ) बदलून हवी असल्यास टिकिट मिळेल का ? मग त्याच्या दुसऱ्या दिवशी अथवा आदल्या दिवशी टिकिट मिळेल का ? मग क्लास नुसार टिकिटाचे भाडे काय होईल ?

असे अनेक प्रश्न विचारताना बराच वेळ जात असतो आणि रांगेतील मागची लोक ओरडत असतात. मग शेवटी वैताग येतो आणि मनात विचार येतो की शेवटी आपली 'एसटी'च बरी.

गावी जाणार्‍या रेल्वेची जर तुम्ही रेल्वे स्टेशनवर थोडी चौकशी करण्याचा प्रयत्न केला तर असा अनुभव नक्कीच तुम्हाला येईल.

या सर्व त्रासावर उत्तम उपाय म्हणजे 'ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग'.

भारतीय रेल्वेच्या  www.irctc.co.in  या वेबसाईटवर ( Indian Raiway Catering and Tourism Corporation ltd.) ऑनलाईन चौकशी, रिझर्वेशन [ Reservation ] म्हणजेच टिकिट आगाऊ राखीव करणे व टिकिट खरेदी अथवा तत्काळ बुकिंग करु शकता. जाणार्‍या येणार्‍या सर्व रेल्वेंची माहिती, टिकिटाची उपलब्धता, येण्या-जाण्याची आणि पोहचण्याची वेळ, एकूण खर्च इ. बरीच माहिती काही क्षणात मिळते. तसेच या वेबसाईटवर ऑनलाईन टिकिट बुकिंगची देखिल चांगली व्यवस्था असून १-२ दिवसांमध्ये टिकिट कुरिअरने आपल्याला घरपोच मिळते.

   
 

पूढे जाण्यासाठी इथे क्लिक करा.

 

 

  प्रस्तावना
  www.irctc.co.in  ह्या वेबसाईटवर मोफत मेंबरशीप घ्या.
  वेबसाईटवरुन ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग
  ऑनलाईन रेल्वे टिकिट बुकिंग ऍनिमेशन (साईझ १३MB) डाऊनलोड करा.
  टिप : वरील टिकिट बुकिंग ऍनिमेशनची फाईल आकाराने फार मोठी आहे. ती डाऊनलोड होण्यासाठी वेळ लागेल, ती आपल्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करुन माऊसने डबल क्लिक करुन पहा.
अधिक माहितीसाठी संपर्क करा. - सचिन पिळणकर - मोबाईल : ० ९८९२२४१४३३.
   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.