आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  प्रसिद्धी
 
  प्रसिद्धी कशी कराल?
 


तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारला की तुम्हाला अंदाजे किती लोक ओळखतात? तर याचे उत्तर देण्याआधी तुम्ही कुणाचा विचार कराल, तुमचे घरातले, शेजारचे, मित्र-मंडळी, विभागातील लोक, तुमच्या शाळेतील-कॉलेजमधील मित्र-मंडळी, तुमच्या ऑफिसमधील लोक, तुम्ही ज्याच्यासाठी आणि ज्यांच्या बरोबर काम करता ती लोक असे अंदाजे किती लोक सांगाल? अंदाजे ही संख्या ५०० पर्यंत जाईल पण १००० च्या वर जाणार नाही.

असो! तरी थोड्यावेळासाठी असे समजूया तुम्हाला १००० लोक ओळखतात. याचा अर्थ तुम्ही प्रसिद्ध आहात असा होत नाही. कारण तुम्हाला जी लोक ओळखतात त्यांनाही जवळपास तेवढीच लोक ओळखत असतील. मग यात प्रसिद्ध होण्याचा विषय येतच नाही.

प्रसिद्धीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक फायदे बरेच आहेत.

आता प्रसिद्धीचे फायदे काय आहेत ते सांगण्याची इथे गरज नाही. तुम्ही स्वतःला नक्कीच (इतरांप्रमाणे) हुशार समजत असाल. तर मग प्रसिद्धीचे फायदे तुम्हाला सांगण्याची गरजच नाही.

एखादी गोष्ट माहीत नसल्यास ती प्रत्यक्षात देखिल नसेल असे आपण बोलत नाही त्याऐवजी असू देखिल शकते हे उत्तर आपण देतो.

डोक्याची ट्यूब पेटल्यानंतर आणि पेटण्यापूर्वीची स्थिती तुम्हाला माहीत असेलच. आपल्या डोक्याची ट्यूब पेटण्यासाठी कुणाची मदतीची गरज नाही. थोडासा विचार केल्यास तुम्हाला देखिल बर्‍याच गोष्टी कळतील.

एका दिवसामध्ये १,००,००० लोकांना तुमच्याबद्दल अथवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल कळल्यास काय होईल?

तुम्हाला वाटेल काही होणार नाही.

त्यापेक्षा असा विचार करा एका दिवसामध्ये जर १,००,००० लोक तुम्हाला अथवा तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल माहिती कळल्यास या गोष्टीचा फायदा तुम्ही कसा करून घ्याल.

जरा विचार करा अशी कोणती गोष्ट असू शकते ज्यामुळे काही पैसे खर्च न करता तुम्ही अथवा तुम्हाला हवी असलेली गोष्ट प्रसिद्ध होईल. थोडासा विचार करा तुम्हाला उत्तर नक्की उत्तर सापडेल आणि नाही सापडल्यास मला विचारु नका......

   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.