आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  सुचना
 
  सुचना : सहजच.कॉम वरील माहितीसंबंधी
 


या वेबसईटवर सांगीतलेल्या बहूतेक गोष्टी ( सर्व नाही ) व्यवस्थित पाहिलेल्या आहेत. त्यामूळे तुमच्या कॉम्प्युटरला काहीच धोका होणार नाही.

लक्षात ठेवा. निट व्यवथित सांगितल्याप्रमाणेच एखादी गोष्ट करा. एखादी क्रिया करताना चुकून दुसरीकडे गेलात काहीही न करता तो प्रोग्राम बंद करा. शोधाशोध अथवा फेरबदल करुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नका. जर तुम्ही एखाद्या ठिकाणी प्रोग्राम मध्ये काही गोष्टी बदलल्या असतील तर त्या लक्षात ठेवा. जेणे करुन काही अडचण ( प्रॉब्लेम ) झाल्यास पून्हा त्याच ठिकाणी जाऊन त्या बदललेल्या गोष्टी परत व्यवस्थित करता येतील.

या वेबसाईटवर विविध ठिकाणी सांगितलेल्या कॉम्प्युटर आणि त्यातील सॉफ्टवेअर्स मधिल छुप्या गोष्टीमूळे कॉम्प्युटरमध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस येण्याची अथवा निर्माण होण्याची शक्यता शुन्य आहे. जर आपल्या कॉम्प्युटरमध्ये व्हायरस असल्यास अथवा आल्यास तो नक्कीच एखाद्या ईमेल वरुन अथवा एखाद्या दुसर्‍या कॉम्प्युटर मधिल फाईलद्वारे आपल्या कॉम्प्युटरमध्ये आला असावा. सहजच.कॉम ही वेबसाईट पूर्णपणे व्हायरस मुक्त आहे म्हणजेच या वेबसाईट वरुन घेतलेल्या अथवा पाहिलेल्या माहितीवरुन कोणताही व्हायरस आपल्या कॉम्प्युटर मध्ये येणार नाही.

या वेबसाईटवर सांगितलेल्या गोष्टी व्यवस्थित कळण्यासाठी सोप्या मराठी भाषेमध्ये दिल्या आहेत. जेणे करुन या वेबसाईटवर वाचलेली प्रक्रिया आपल्या कॉम्प्युटरवर करताना आपल्या हातून कोणतीही चूक होऊ नये यासाठी बर्‍याच ठिकाणी चित्राचा वापर केला आहे. तसेच सर्व प्रक्रिया क्रमाक्रमाने दिली आहे. तरीही आपल्या हातून एखादी चूक झाल्यास काहीही घाबरण्याचे कारण नाही. कारण झाल्यास ती चूक फारलहान स्वरुपाची असू शकते. पण तरीही शक्य असल्यास ती चूक सूधारण्यासाठी एखाद्या कॉम्प्युटर हार्डवेअर वाल्याची मदत घ्या.

विविध ठिकाणी एखादी गोष्ट करण्याची प्रक्रिया दिलेल्या जागी खाली त्याचे चित्र दिले आहे. उदा. एखाद्या ठिकाणी 'माऊसने राईट क्लिक करा' असे दिले असेल तर तेथे माऊसने राईट क्लिक केल्याने एखादा छोटा चौकोन येईल त्याचे चित्र दिले असेल. याचा तेथे त्या चित्रावर माऊसने राईट क्लिक करावे असा होत नाही, तर सांगितलेल्या ठिकाणी माऊसने राईट क्लिक केल्यास तसा छोटा चौकोन तिथे येईल असा होतो.

शक्यतो आपल्या हातून कोणतीही चूक होणार नाही असे जरी असले तरी सुरक्षिततेसाठी "सहजच.कॉम वेबसाईटवर सांगितलेली कुठल्याही प्रक्रिया करताना जर आपल्या कामाच्या फाईलींना प्रोब्लेम झाल्यास अथवा आपला कॉम्प्युटर बिघडल्यास त्याला सहजच.कॉम वेबसाईट अथवा सचिन पिळणकर ( हि वेबसाईट बनविणारा ) जबाबदार रहाणार नाही."

   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.