आपल्या मित्र-मैत्रीणींना तसेच इतरांना सहजच.कॉमबद्दल कळविण्यासाठी
इथे क्लिक करा.

 

इथे खरंच कुणाची मदत करायची
तयारी आहे का?
 
  मदत
 
  इथे खरंच कुणाची मदत करायची तयारी आहे का?
 


अवकाशवेध.कॉम नंतर आता सहजच.कॉम ही वेबसाइट मराठी माणसाच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे.

मराठी भाषेसोबत मराठी माणसाची देखिल प्रगती व्हावी याच एका उद्देशाने या दोन वेबसाइटची निर्मिती केली आहे.

अवकाशवेध.कॉम ही खगोलशास्त्र या आवश्यक व महत्त्वाच्या विज्ञान विषयक वेबसाइट मराठीमध्ये सोप्याभाषेमध्ये सर्वस्थरातील, वर्गातील तसेच वयाच्या मराठी माणसाला ज्ञान पुरविणारी वेबसाइट असून या वेबसाइटला महाराष्ट्र शासनाचे सर्वोत्कृष्ट मराठी वेबसाइटचे प्रथम पारितोषिक देखिल मिळाले आहे.

सहजच.कॉम या वेबसाइटचा मुख्य उद्देश मराठी माणसाला कॉम्प्युटरमध्ये सुपर एक्सपर्ट बनविणे हा आहे. आपणास कॉम्प्युटरवर काम करता जरी येत असले तरी अनेक आवश्यक गोष्टीची आपणास माहिती नसते. कितीतरी वेळा आपणास इतरांची मदत घ्यावी लागते. अनेक लहान-लहान गोष्टींपासून कितीतरी मोठ-मोठ्या गोष्टी इथे सहज सोप्या भाषेमध्ये शिकविल्या आहेत.

भविष्यामध्ये अशा अनेक चांगल्या आणि लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्याच्या कामाला कधीच सुरवात झाली आहे. परंतू जसे आधी 'पोटोबा मग विठोबा' त्याच प्रमाणे एकट्याने किती गोष्टी सांभाळणार. सहजच.कॉम वेबसाइट बनविण्यासाठीच मला दोन वर्षे लागलीत. सर्वसामान्य आर्थिक अडचणींमुळे इतर बाहेरील कामे घेण्याशिवाय पर्याय नाही आणि इतर बाहेरील कामे करताना लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्याच्या कामाला उशीर होतो. आजपर्यंत बर्‍याच क्षेत्रातील ज्ञान मिळविले हेच ज्ञान लोकांपर्यंत पोहचविण्याचा वेबसाइट हा एक चांगला पर्याय आहे. त्यात सध्या इंटरनेटच्या माध्यमातून मराठीमध्ये ज्ञान प्रबोधनाची तरुणपिढीला फार गरज आहे. यासाठी माहिती पुरविणार्‍या आणि निरनिराळ्या क्षेत्रातील मराठी वेबसाइट बनण्याची फार गरज आहे.

सध्या अनेक सेवाभावी संस्था समाजकार्य करीत आहेत. इथे अवकाशवेध.कॉम व सहजच.कॉम चालविणारी कुठली संस्था नाही किंवा कुठल्याही आर्थिक मदतीशिवाय या दोन वेबसाइट बनविल्या आहेत. तसेच कुठलीही आर्थिक मदत मिळावी या हेतूने देखिल या दोन वेबसाइटची निर्मिती केली गेली नाही.

असे असले तरी ज्या कुणाला या व अशा अनेक चांगल्या आणि लोकोपयोगी मराठी वेबसाइट बनविण्यासाठी आर्थिक मदत करावीशी वाटत असेल त्यांचे स्वागत आहे. तसेच आपल्या आर्थिक मदतीचा वापर योग्य प्रकारे केला जाईल यावर आपण विश्वास ठेवाल अशी अपेक्षा आहे. कारण कुठलीही लेखी हमी देणे म्हणजे मिळणार्‍या मदतीचा व्यवहार करणे असे मला वाटते.

सहजच.कॉम वेबसाइटवर दिलेली माझी ओळख माझ्याबद्दलची अधिक माहिती देण्यास आपणास उपयोगी पडेल.

   
  एखाद्या ठिकाणी एखाद्या देवाचे मंदिर बांधण्याची कल्पना प्रथम मंदिराबद्दल सर्वात जास्त आस्था असणार्‍याला सुचते. मग तो ती कल्पना इतरांना सुचवितो. कारण एकट्याने मंदिर बांधणे त्याच्या एकट्याचा अवाक्यात नसते. त्याची कल्पना सहाजिकच इतरांना आवडते. मग सर्वांच्या आर्थिक तसेच शारिरीक मदतीतून एक सुंदर मंदिर निर्माण होते. प्रत्यक्षात मंदिर तयार होण्यापर्यंत बर्‍याच लोकांच्या मदतीचा हातभार त्याला लागलेला असतो. इथे अशाचप्रकारे इंटरनेटच्या माध्यमातून अनेक चांगल्या आणि उपयोगी मराठी वेबसाइट बनवून ज्ञानाचे मंदिर बांधण्याच्या कामाला
मी एकट्याने
सुरुवात केली आहे.
   
  ज्ञान प्रबोधनाच्या प्रकल्पामध्ये आपणास आर्थिक मदत करायची असल्यास संपर्क करा.
  इथे क्लिक करा.
   
सुचना - सहजच.कॉम वरील माहिती संबंधी
सहजच.कॉम वरील सर्व हक्क राखिव आहेत. - अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.